लाडकी बहीण योजनेबाबत १२ फेब्रुवारीला काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आल्याने फिस्कल स्पेस कमी झाली आहे मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार ही योजना बंद करणार,ती योजना बंद करणार आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही व ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत.मी हे देखील अधिकाऱ्यांना सांगितले की रिव्हर्स गणित मांडा की आपली प्रगती करण्यासाठी किती गुंतवणूक करायची आहे ? किती करु शकतो ? २५ हजार कोटींचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्राकडून विविध योजनांमधून आणता येईल का ? याचा विचार आम्ही करतो आहोत.इतर कुठल्या योजनांच्या माध्यमांतून निधी उभा राहिल हे आम्ही पाहतो आहोत.महसुली तूट वाढते आहे म्हणून भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये आम्हाला जायचे नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.दरम्यान प्रणिती शिंदेंनी सरकारवर आरोप केला आहे.