Just another WordPress site

विधानसभा आश्वासन समिती अध्यक्षपदी आमदार रवी राणा यांची नियुक्ती !!

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या संमतीने सतत चौथ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून विजयी झालेले आमदार रवी राणा यांची नियुक्ती महाराष्ट्र विधानसभा विधीमंडळ आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली असून ते या समितीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देतील.या समितीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाविषयी सभागृहात मंत्री,राज्यमंत्री,राज्यातील मंत्रालयीन मुख्य सचिव,अमूस,प्रधान सचिव,सचिव व क्लास व ते कनिष्ठ अधिकाऱ्याचे समन्वयातून मंत्री आश्वासन देत असतात व त्याची पूर्तता,अंमलबजावणी करणे या समितीचे अधिकार व कार्य आहे.आमदार रवी राणा या समितीचे माध्यमातुन राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवणार असून राज्याला पुढे नेण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी करून जनतेला विधीमंडळाचे माध्यमातुन न्याय मिळवुन देऊ असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

दरम्यान मंत्रालयीन अप्पर मुख्य सचिव,सचिव व अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी या समितीचे अध्यक्ष त्यांना बोलावत असतात व त्यांची साक्ष घेण्यासाठी त्यांना उपस्थित ठेवतात या समन्वयाने आश्वासन पूर्ती होत असते अश्या पद्धतीने अध्यक्ष आश्वासन त्याची अंमलबजावणी व पूर्तता करत असतात.राज्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याचे अधिकार अध्यक्ष यांना असतात व समितीचे अधिकारातून ते कार्य करत असतात.या अनुषंगाने आमदार रवी राणा आता संपूर्ण राज्यावर या समितीच्या माध्यमातून राज्यातील सनदी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहे.राज्याला पुढे नेण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी करणार व जनतेची जास्त जोमाने सेवा करणार असे आमदार रवी राणा यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.