मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होतो तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होते पण आता आमच्या खुर्च्या बदलल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची मात्र फिक्स आहे.माझे आणि देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबदलीचे ‘अंडरस्टँडिंग ’ असल्याचे शिंदे यांनी मिश्कीलपणे म्हणाले.अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे म्हटल्यावर एकनाथ शिंदेंना अजित पवार यांनीही मिश्किलपणे टोला लगावला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमची टीम जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या बदलल्या आहेत पण अजित पवारांची खुर्ची फिक्स असल्याचे मिश्कील वक्तव्य करत टोला लगावला.यावर लगेचच अजित पवार यांनीही उत्तर दिले.“तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू” असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली.महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.शपथविधीच्या एक दिवस आधीही त्यांनी शपथ घेणार की नाही हे नीट सांगितले नव्हते त्यावेळीही अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंचे मला माहीत नाही मी तर शपथ घेणार आहे असे वक्तव्य केले होते ज्यामुळे हशा पिकला होता.त्याच प्रसंगाची आठवण आजच्या शाब्दिक चिमट्यांमुळे उपस्थितांना झाली.