यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
येथील यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी पुणे येथे स्वारगेट झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यावल एसटी आगारात प्रत्यक्ष भेट देऊन महिला प्रवाशांची भेट घेऊन बसमध्ये चढतांना किंवा बस आगारात आपणास काही अडचणी येतात का ? याबाबत प्रवाशी महिलांशी हितगुज करीत त्यांना येणाऱ्या समस्या जाणुन घेतल्या.
दरम्यान आमदार अमोल जावळे यांनी यावल एसटी आगारात प्रत्यक्ष भेट दिली या ठिकाणी ज्या १o नव्या बसेस आलेले आहे त्या ठिकाणी जाऊन बसेसची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन,भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी,भूषण फेगडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसंगी यावल एसटी आगारात नव्याने कॅमेरे बसवण्या संदर्भात दीलीप महाजन यांनी आमदार महोदयांना अवगत केले तसेच बसमध्ये प्रत्यक्ष चढून कॉलेजच्या विद्यार्थिनी व प्रवासी महिलांच्या आमदार अमोल जावळे यांनी अडीअडचणी समजून घेतल्या व मुंबई येथे स्वारगेट परिसरात झालेल्या घटने संदर्भात मुलींची ओपन चर्चा केली.या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार वाढलेले आहेत तसेच महिलांच्या मंगल पोथा मोठ्या प्रमाणावर मारल्या गेल्या आहेत तरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात मात्र आरोपी सापडत नाही.दरम्यान मुली तक्रारी देण्यासाठी पुढे येत नाहीत यासंदर्भात बस स्टॅन्ड एरिया मध्ये कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त हवा असे महिलांनी तक्रार आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्याकडे केली असता त्यांनी तात्काळ यावलचे पोलीस निरीक्षक यांचीही भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला व या ठिकाणी कुठली स्वारगेट पुणे सारखी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपण कायम स्वरूपी एक पोलीस नियुक्त करावा असे सूचित केले यामुळे महिला वर्गांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.