Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव व सामूहिक हनुमान चाळीस पठण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे चैत्र पौर्णिमा निमित्ताने दि.१२ एप्रिल शनिवार रोजी हनुमान जयंती निमित्ताने हनुमान जन्मोत्सव व सामूहिक हनुमान चाळीस पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान तालुक्यातील डोंगर कठोरा येथे चैत्र पौर्णिमा निमित्ताने दि.१२ एप्रिल शनिवार रोजी पंचवटी मंदिराजवळ हनुमान जयंती निमित्ताने हनुमान जन्मोत्सव व सामूहिक हनुमान चाळीस पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर सकाळी ८ ते ११ यावेळेत अन्नदाते तुषार वसंतराव झोपे यांच्याकडून संपूर्ण गावातील लोकांना (गाववेस पंगत) महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सदरील हनुमान जन्मोत्सव व सामूहिक हनुमान चाळीस पठण कार्यक्रमाचा गावकऱ्यांनी तसेच भाविक भक्तांनी लाभ घ्यावा तसेच सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.सदरील कार्यक्रमाला ग्रामपंचायत,महादेव मारुती मंदिर ट्रस्ट,स्वामीनारायण मंदिर,पंचवटी विठ्ठल मंदिर,गढीवरील विठ्ठल मंदिर यांच्यासह सर्व डोंगर कठोरा वासियांचे सहकार्य लाभणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.