महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल १५ एप्रिल रोजी मुंबई येथे सत्कार !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांनी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मुंबई यांच्या हस्ते दि.१५ एप्रिल २५ मंगळवार रोजी राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांनी आपली जबाबदारी सांभाळत असतांना ‘सेवा हेच कर्तव्य’ हे ब्रीद नेहमी अंगीकारून जिल्ह्यातील प्रत्येक सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पूर्ण वेळ देऊन सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या समस्या समजावून घेत त्या लागलीच सोडविण्यासाठी त्यांना मदत केली असून त्यांचा सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या समस्या सोडविण्यात मोठा हातखंडा आहे.प्रसंगी प्रत्येक सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या समस्या सोडवितांना त्यांनी नेहमी आपलेपणाने काम करून प्रत्येक सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांमध्ये मित्रत्वाचे नाते निर्माण केले आहे.मनमिळाऊ व्यक्तिमत्व व प्रत्येकाला समजून घेण्याची प्रवृत्ती हीच जणू त्यांच्या निवडीची पावती त्यांना मिळाली असावी असे सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांमधून बोलले जात आहे.सदरहू स्वप्नील पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून त्यांची राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मुंबई यांच्या हस्ते दि.१५ एप्रिल २५ मंगळवार रोजी राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.सदरील बाब हि जिल्ह्यातील प्रत्येकाची मान ही अभिमानाने उंचविणारी ठरणार आहे हे विशेष !.