सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी)
दि.२८ एप्रिल २५ सोमवार
येथील संघर्षशील सामाजिक कार्यकर्त्या पुनमताई पाटील यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांना आज दि.२८ एप्रिल २५ रोजी अधिकृतरित्या नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
दरम्यान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी स्वाक्षरीत नियुक्तीपत्राद्वारे त्यांची निवड जाहीर केली आहे.या नव्या जबाबदारीनुसार पुनमताई पाटील या उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील भ्रष्टाचारविरोधी मोहिमा अधिक बळकट करतील व नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देतील अशी अपेक्षा जनसामान्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.पुनम ताई पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत आहेत तसेच त्यांनी महिलांचे सक्षमीकरण,शिक्षणाचा प्रसार व शेतकरी हक्कासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.त्यांच्या या अथक कार्याचा सन्मान म्हणून ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.सदरहू पुनमताई पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे पाडळसे गावासह संपूर्ण यावल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दरम्यान गावकऱ्यांनीही त्यांच्या या यशाचे स्वागत करत भविष्यातील सामाजिक लढ्यांसाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.”सत्याच्या आणि पारदर्शक व्यवस्थेच्या स्थापनेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असा विश्वास पुनमताई पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलतांना व्यक्त केला आहे.