Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे कामगार दिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०१ मे २५ गुरुवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे काल दि.०१ मे गुरुवार रोजी कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने तलाठी,वीज,कृषी,आरोग्य,पोस्ट,ग्रामपंचायत या विभागातील कर्मचारी तसेच अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व महिला महाविद्यालयातील कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर या कर्मचाऱ्यांचा शाल,श्रीफळ व रुमाल टोपी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.प्रसंगी ध्वजारोहण सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात उपस्थित कृषी पर्यवेक्षक एन.जी.पाटील,कृषी सहाय्यक आर.बी.पवार,विकास सोसायटी सचिव विजयसिंग पाटील,ग्रामपंचायत अधिकरी ए.टी.बगाडे,पशुधन अधिकारी ठोंबरे,तलाठी गजानन पाटील,कोतवाल विजय आढाळे,सहकारी सुरेश झांबरे,पोस्ट मास्तर अनिल सोनवणे,वीज लाईनमन प्रकाश तायडे,वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र डोळसे,महेंद्र कुरकुरे,अमित बेंडाळे,उमेश पाटील,रवींद्र भोई,उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी हर्षल चौधरी,आरोग्य सेवक चेतन कुरकुरे,आरोग्य सेविका लता चौधरी,महिला महाविद्यालयातील कल्याण पाटील,तुषार पाटील,अरविंद कुरकुरे, ललित पाटील,अरुणा तायडे,अच्युत धनाजी चौधरी विद्यालयातील कर्मचारी मुख्य लिपिक ठकसेन राणे,ग्रंथपाल योगेश राणे,शिपाई पराग पाटील,संदीप बाविस्कर,मिलिंद भिरूड, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप पाटील,सायबू तडवी,कल्पेश कोल्हे,संतोष कोळी यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा आढाळे,रेखा बागुल,मिनाक्षी राणे,चारुलता झांबरे,आशा वर्कर रोहिणी तायडे,जयश्री जंगले,सरोज जावळे व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,ऐश्वर्या कोलते,आशा आढाळे,कल्पना राणे,कल्पना पाटील,हेमलता जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसंगी वीज वितरण वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र डोळसे यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.दरम्यान पाणीपुरवठा नोकर खेमचंद्र पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सपत्नीक शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रोजगार सेवक डिगंबर खडसे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेकरिता ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत अधिकारी,सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप पाटील,ऑपरेटर कल्पेश कोल्हे,पाणीपुरवठा नोकर सायबू तडवी,संतोष कोळी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.