यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ मे २५ शुक्रवार
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व स्पष्ट निर्देशानुसार भालोद येथे महसूल विभागातील विविध योजनांबाबतचे आधार व्हेरिफिकेशन शिबीर गावपातळीवर यशस्वीरित्या पार पडले.या शिबीराचा परिसरातील अनेक गरजु नागरीकांना लाभ घेतला.सदर उपक्रम मूळतः यावल तहसील कार्यालयात राबवला जाणार होता मात्र निराधार,अंध,अपंग व गरजू लाभार्थ्यांना तालुक्याला येण्याचा त्रास होऊ नये यासाठी हा कार्यक्रम गावपातळीवरच शिबिर स्वरूपात घेण्याचे निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले.परिणामी त्यांच्या या लोकाभिमुख निर्णयामुळे गावातच ‘तहसील सेवा’ उपलब्ध झाली.
दरम्यान या उपक्रमाचे आयोजन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी निराधार योजना तसेच अन्य सामाजिक योजनांसाठी DBT पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करण्यात आले.कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे,भालोद गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप कोळी तसेच कृषीभूषण पुरस्कार प्राप्त भालोद येथील नारायण चौधरी यांनी मार्गदर्शन केले.प्रसंगी यावल कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी यांनी आमदार अमोल जावळे यांनी गावपातळीवरच तहसील सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले व त्यांच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मीनल जावळे व रमेश झांबरे यांनी लाभार्थ्यांना योजनांसंदर्भात माहिती दिली.सदर शिबीर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल वानखेडे,तहसील कार्यालय,सकावत तडवी (संजय गांधी योजना अवल कारकून) मंडळ अधिकारी अनिल सुरवाडे तसेच भालोद मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी मोलाचे योगदान दिले.