यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ मे २५ बुधवार
येथील यावल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेतून एकूण २७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी २७ पैक्की २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान जे टी महाजन इंग्लिश स्कूलचा माध्यमिक शालांत दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. यात प्रथम क्रमांक हिताक्षी विनोद बाविस्कर ९१.८०,द्वितीय क्रमांक मिताली व्यंकटेश बारी ९१.६०,तृतीय क्रमांक विभागून खुशबू गणेश धांडे ९१ .४० व तृतीय क्रमांक सारा युनूस तडवी ९१ .४० तर चतुर्थ क्रमांक देवयानी मनोज करणकर हिने ९०.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.सदरील शालांत परिक्षेत सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन शरद जिवराम महाजन, संचालक मंडळ,प्रिन्सिपल रंजना महाजन,प्रिन्सिपल दिपाली धांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.