Just another WordPress site

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील गावपातळीवरील दाखले वाटपास मतदारसंघात उत्तम प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ मे २५ गुरुवार

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतुन महसुल प्रशासनाच्या वतीने गावपातळीवर विविध प्रकारचे दाखले व आदी कामे मिळावे याकरीता सुरू करण्यात आलेल्या गावपातळीवरील शिबीरांना नागरीकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार काल दि.१४ मे रोजी रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बु.येथे मंडळस्तरीय संजय गांधी योजना संदर्भात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले व या शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.केऱ्हाळे तालुका रावेर येथे संपन्न झालेल्या या शिबीरामध्ये एकूण १७४ लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.शिबीराला केऱ्हाळे परिसरातील लाभार्थ्यांनी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गावकऱ्यांचे सहकार्यही मोलाचे ठरले.विशेषतः गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर पाटील यांनी या शिबीरासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून देऊन मोलाचा हातभार लावला.आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतुन आणि सुचनेवरून आपल्या मतदार संघातील नागरीकांना गाव पातळीवर विविध प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावे या दृष्टीकोणातुन यावल रावेर मतदार संघातील तालुक्यात हे शिबीर राबविले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.