यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २५ शुक्रवार
तालुक्यातील फैजपूर जे.टी.महाजन इंग्लिश मेडियम शाळेत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इ.१० वी च्या परीक्षेत मारुळ येथील विद्यार्थिनी सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिने ९२ टक्के गन मिळवून यश संपादन केले आहे.सैय्यद आयेशा या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान मारूळ येथिल विद्यार्थीनी सैय्यद आयेशा नदीम अक्तर हि मारूळ येथे उर्दु हायस्कूलमध्ये इयत्ता ८ वीचे शिक्षण घेतले होते व त्यानंतर मागील वर्षी फैजपूर येथिल जे.टी.महाजन इंग्लिश मेडीअम शाळेमध्ये इयत्ता १० च्या इयत्तेत शिक्षण घेत असतांना सैय्यद आयेशा हिने ९२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.तर विशेष म्हणजे सायन्स या विषयात १०० पैकी ९८ गुण मिळवून मोठे यश मिळवले आहे.सदरहू सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिचे यावल तालुक्यातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.दरम्यान सैय्यद आयेशा हिस मोझेस सर मुख्याध्यापक जे.टी,महाजन इंग्लिश मीडियम स्कूल न्हावी,विद्यालयाचे अध्यक्ष शरद महाराज,प्रा.डॅनिश जनाब,हनीफ सर,सोहेल अहमद,नसीम अहमद,अश्फाक अली यांचे मार्गदर्शन लाभले.