तालुक्यातील दलित वस्तीच्या विकास निधीचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर गुन्हे दाखल करा-अशोक तायडे यांची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २५ गुरुवार
तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांगवी बुद्रुक,हिंगोणा व राजोरा या ग्रामपंचायतीत सर्व नियम धाब्यावर ठेवुन झालेल्या विविध विकास कामे हे निकृष्ट दर्जाचे असून या कामांची तात्काळ चौकशी होऊन संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व रिपाई आठवले गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष अशोक तायडे यांनी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात अशोक तायडे यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील राजोरा व बोरखेडा बु या गावांमध्ये दलित वस्ती नसतांना देखील शासनाचा लाखो रुपयांचा निधी शासनाची दिशाभुल करून हा दुसऱ्या ठीकाणी खर्च करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्तीच्या विकासाकरीता मिळालेल्या निधीतुन करण्यात आलेली कामे ही अत्यंत निकृष्ठ प्रतिची असुन अशाप्रकारे शासनाची दिशाभूल करीत निधीचा दुरुपयोग करणाऱ्या या गावातील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर दलीत वस्तीचा संगनमताने दुरुपयोग केला म्हणुन राजोरा,सांगवी बु॥ व हिंगोणा ग्रामपंचायतीच्या कामांची तात्काळ चौकशी करून संबधितांवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एका तक्रार निवेदनाद्वारे यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे रिपाई आठवले गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे.दरम्यान तसे न झाल्यास आपण यावल पंचायत समिती समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.