Just another WordPress site

यावल वनविभागाच्या वतीने आयोजित ऑपरेशन सिन्दुर रक्तदान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ जून २५ सोमवार

येथील यावल वनपरिक्षेत्र विभाग आणी इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन सिन्दुर रक्तदान अभियान राबविण्यात आले.आपल्या देशात उद्धभवलेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता मुबलक रक्तसाठा आवश्वकतेनुसार राष्ट्रीय पातळीवर पाठविण्याच्या दृष्टीकोणातुन नियोजन करण्याच्या उद्देशाने यावल येथे प्रादेशीक वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरच्या रक्तदान कार्यक्रमास वन कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावल येथे जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान यावल येथे उपवनसंरक्षक जमीर शेख यावल विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतुन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डांभुर्णी तालुका यावल या शिवारातील नरभक्षक बिबट या वनप्राण्यास वन विभागाच्या कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून जेरबंद केले होते व या उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रसश्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आले.यावेळी वन विभागाच्यावतीने व मान्यवरांच्या वतीने विविध जातीच्या वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.तसेच इंडीयन रॅडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आलेल्या ऑपरेशन सिन्दुर रक्तदान अभियानात ३५ जणांनी आपले रक्तदान केले.या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी यावल वनविभाग जळगावचे उपवनसंरक्षक जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पा समाधान पाटील,सहाय्यक वन संरक्षक वनीकरण व वनजिव प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे,यावल पश्चीम क्षेत्राचे वनपरिक्षेत्राचे कर्मचारी व सर्व वनकर्मचारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.