Just another WordPress site

यावल शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी अकीलोद्दीन शेख यांची नियुक्ती !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ जुलै २५ मंगळवार

येथील सामाजीक कार्यकर्ते अकिलोद्दीन नसिमोद्दीन शेख यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या शहर अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग अंतर्गत यावल शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष म्हणून अकिलोद्दीन नसिमोद्दीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अकीलोद्दीन शेख यांच्या निवडीचे जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार व माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार रमेश चौधरी,यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील,एनएसयुआयचे धनंजय चौधरी व जळगाव जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल हमीद शेख,मारूळ सैय्यद जावेद अली जनाब,मारूळचे लोकनियुक्त सरपंच सैय्यद असद अली जावेद अली,काँग्रेस कमेटीचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे,यावलचे माजी नगरसेवक समीर मोमीन,यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी,अमोल भिरुड,अनिल जंजाळे,नईम शेख व सर्व काँग्रेस कार्यकर्ते यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.