Just another WordPress site

किनगाव येथील मनिष पाटील व पुनम पाटील यांनी पंढरपूर वारीतील भाविकांना केलेल्या मदती निमित्ताने त्यांचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार

सवर कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर येथे इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे सचिव तसेच स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील व त्यांच्या धर्मपत्नी पुनम पाटील यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जी मनियार,डॉ.वृणाल मोरे व डॉ.प्राजक्ता मोरे यांनी विठ्ठलाची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.

दरम्यान अन्न आणि औषधे प्रशासनाचे माजी सहाय्यक आयुक्त विजयकुमार देवचंद पाटील (व्हि.डी.नाना ) व मनिष विजयकुमार पाटील यांनी भक्तांच्या निवास व भोजनासाठी पंढरपूर येथे श्रीसंत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मोठा मठ उभारला असून दरवर्षी या मठात भाविकांची निवासासह भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते.तसेच स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून मनिष पाटील हे गरीब व गरजूंना मदतही करतात तर मनिष पाटील हे अचल फार्मसी व संजिवन हॉस्पिटल,डेक्कन पुणे चे संचालक असुन त्यांचे फार्मा क्षेत्रात तळागाळापर्यंत व जीवाभावाचे संबंध आहेत.एकंदरीतच त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक व उदयोग कार्याचा गौरव सवर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने नुकताच करण्यात आला.
मनिष पाटील व पुनम पाटील यांच्या सन्मान प्रसंगी इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे संस्थापक अध्यक्ष व्ही.डी.पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.