Just another WordPress site

किनगाव निवासी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार

तालुक्यातील किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पात्र करून शिक्षक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.या कार्यक्रमाच्या सुरूवातीला माता सरस्वती व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करूण पुजन करण्यात आले.

दरम्यान विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिक्षकांची भूमिका आपआपसात वाटून घेतली व स्कुलच्या दैनंदिनीनुसार विद्यार्थी शिक्षकांनी तासीकेवर हजर होऊन विद्यार्थ्यांना शिकवले तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले होते त्यात संगीत खुर्ची,काहीतरी उपक्रम करून हसविणे,शिक्षकांचे गुणवैशिष्ट्ये ओळखणे असे विविध खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी केले.तर इ ७ वी च्याविद्यार्थ्यांनी शिक्षकांना शर्टच्या पाँकेटला लावण्यासाठी बँचेस बनवून आपल्या हाताने ते बँचेस आपल्या गुरूंच्या शर्टला लावले त्यानंतर शेवटच्या दोन तासिकेमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांच्या तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यांना शिक्षकांची भुमीका साकारतांना शिक्षक दिनाचा आलेला अनुभव विद्यार्थ्यांनी सांगीतला व शिक्षक कशा पद्धतीने आमच्यासाठी प्रयत्न करतात हे विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.यावेळी संस्थाध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील,उपमुख्याध्यापक सुहास भालेराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.