Just another WordPress site

यावल येथील जे टी महाजन स्कुलची विद्यार्थीनी मिताली कोल्हे सोलो डान्स स्पर्धत प्रथम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार

येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील जिल्हास्तरीय कला उत्सव २५-२६ या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे विभागीय कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या या स्पर्धा अध्यापक विद्यालय एम.जे.कॉलेज परिसर येथे आयोजित करण्यात आल्या.

या स्पर्धेमध्ये पारिसरातील अनेक शाळानी आपला सहभाग नोंदविला होता.यामध्ये व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधील ९ वी क्लासची विद्यार्थिनी मिताली किशोर कोल्हे हिने सोलो डान्स या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला व तिची आता नाशिक विभागीय स्तरावर निवड झाली आहे.कु.मिताली कोल्हे हिने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन व सर्व संचालक मंडळ,सेमी विभागाच्या प्राचार्या रंजना महाजन व इंग्लिश विभागाच्या प्राचार्य दिपाली धांडे यांनी कु.मितालीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.