Just another WordPress site

खासदार स्मिताताई वाघ यांनी भडगांव येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी साधला संवाद…!!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगांव तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२७ सप्टेंबर २५ शनिवार

शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी खासदार स्मिताताई वाघ यांनी संवाद साधत धीर दिला.समवेत मुख्याधिकारी रवींद्र लांडे,शेतकरी संघ संचालिका मा.नगरसेविका योजना पाटील,मा.अध्यक्ष सोमनाथ पाटील,भडगांव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर,कजगांव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील,ता.चिटणीस भगवान पाटील,शैलेश पाटील,डॉ.पंकज जाधव, शेखर पाटील,कार्य.सदस्य अनुक्रमे नूतन पाटील,प्रमोद पाटील,मनिषा पाटील,रेखा शिरसाठ,जिजाबाई चव्हाण,सुरेखा वाघ,कुणाल पाटील,प्रदीप पाटील,किरण शिंपी,विशाल पाटील,विशाल चौधरी, विकास महाजन,गोरख महाजन,राहुल देशमुख,दिलीप वाघ,पांडुरंग पाटील,जवाहर चव्हाण,भूषण देवरे,डी.डी.पाटील सह नगरपरिषदेचे विभाग प्रमुख,सहकारी कर्मचारी यांनी नागरिकांसोबत झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांची संवाद साधत धीर दिला.

दरम्यान सरकारी दवाखाना,अग्निशामक केंद्र,शिवनेरी गेट परिसर,जयहिंद कॉलनी मराठी शाळा परिसर,शेतकरी संघ, फ्रुटसेल,दत्ताआबा शॉपिंग,तहसील कार्यालय समोरील परिसर येथील नुकसानीची पाहणी करत सरसकट पंचनामे करा व तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी बंद स्थितीत असलेल्या मोऱ्या दुरुस्त करणे, नवीन मोऱ्यांचे प्रस्ताव स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन घेत तयार करून त्वरीत पाठवा असे खासदार स्मिताताई वाघ यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना सूचित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.