Just another WordPress site

अँटी करप्शन अँड मीडिया इन्व्हेस्टीगेशन जळगाव जिल्हाध्यक्षपदी भूषण नगरे यांची निवड !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ ऑक्टोबर २५ सोमवार

यावल तालुक्यातील रहिवासी असलेले तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,विजिलेन्स डिपार्टमेंट,सेवानिवृत्त पोलीस व अधिकारी आणि कर्मचारी,होमगार्ड आणि परिवहन विभाग (आरटीओ) तसेच इतर विभागातील कर्मचारी यांचे कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यात सहकार्य करणारे तसेच पोलीस बॉईज असोसिएशन व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून सतत कार्यरत असलेले भूषण पंढरीनाथ नगरे यांची अँटी करप्शन अँड मीडिया इन्व्हेस्टीगेशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.सदरहू अँटी करप्शन अँड मीडिया इन्व्हेस्टीगेशनच्या  जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष संजय बन्सल यांच्या वतीने त्यांना कळविण्यात आले आहे.

दरम्यान भूषण नगरे हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असून भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी पाठपुरावा करत असतांना जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,विजिलेन्स डिपार्टमेंट, इतर विभागातील सेवानिवृत्त पोलीस व अधिकारी आणि कर्मचारी,होमगार्ड आणि परिवहन विभाग (आरटीओ) तसेच त्यांचे कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यापासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून सतत कार्य करत असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष संजय बन्सल यांनी भूषण नगरे यांच्यावर जळगाव जिल्हा अध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.सामाजिक कार्यकर्ते व सर्वांच्या सुख दुःखात कामात सदैव धावून येणारे भूषण नगरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.