यावल शहरात नगर परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसहिंतेची काटेकोर अंमलबजावणी !! शहरातील शुभेच्छा फलक काढले !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ नोव्हेंबर २५ गुरुवार
राज्यात पुढील महीन्यात दोन डिसेंबर रोजी होवु घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीची आचारसहींता लागु करण्यात आली असुन यावल शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय मंडळीचे शुभेच्छा देणारे बॅनर व फलक काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या २४६ नगर परिषद आणी ४२ नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा काल झालेल्या पत्रकार परिषदमध्ये राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आला असुन या पार्श्वभुमीवर राज्यात आदर्श आचार सहिंता लागु करण्यात आली आहे.यानिमित्ताने यावल शहर नगर परिषदेच्या वतीने आदर्श आचार सहींतेची काटेकोर अमलबजावणी व्हावी यासाठी यावल नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी रविकांत डांगे यांच्या आदेशाने शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली राजकीय मंडळीची शुभेच्छा फलक नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने काढण्यात येत आहे.