यावल नगर पालिका निवडणुक विश्लेषण : प्रभाग २ मधील आदिवासी उमेदवार सेवानिवृत अधिकारी रूबाब तडवी यांना वाढता पाठींबा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ नोव्हेंबर २५ शनिवार
येत्या दोन डिसेंबर रोजी संपुर्ण राज्यासह यावल येथे होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातुन होणाऱ्या नगरपालीका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दोन मधून आदिवासी उमेदवार सेवानिवृत अधिकारी रूबाब तडवी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.सदरहू आपल्या समर्थकांसह त्यांनी प्रचार सुरू केला असुन त्यांच्या प्रचारास सर्व स्तरावरून चांगला पाठींबा मिळत आहे.
दरम्यान यावल नगरपालिकाच्या निवडणुक प्रचारास वेग आला असुन यावल शहरातील विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रातील प्रभाग दोन मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणुन सेवानिवृत ग्रामविकास अधिकारी रुबाब महमंद तडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदिवासी समाजाच्या अनुसुचित जमातीच्या राखीव जागेसाठी नगरसेवक पदाकरीता उमेदवार म्हणुन रुबाब महमंद तडवी असुन सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी म्हणुन त्यांना प्रशासकीय विकास कामांचा दांडगा अनुभव आहे.तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदर्श अधिकारी म्हणुन पुरस्कारांने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.शहरातील सर्व जाती धर्मातील नागरीकांशी त्यांचा असलेला संपर्क हे त्यांच्या जमेची बाजु असुन त्यांच्या समर्थकांनी मोठया मतधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे.