Just another WordPress site

बडगुजर समाजास केन्द्रीय ओबीसीमध्ये सवलत मिळवण्याच्या समाज शिष्ठमंडळाची दिल्ली येथे केन्द्र शासनाकडे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ डिसेंबर २५ शुक्रवार

बडगुजर समाजास केंद्रीय ओबीसीमध्ये सवलत मिळविण्यासाठी बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी येथील राष्ट्रीय ओबीसी कमिटीचे चेअरमन सेवा निवृत्त प्राचार्य पी.आर.बडगुजर, बडगुजर समाज राष्ट्रीय ओबीसी कमिटी व्हाईस चेअरमन एस.एम.बडगुजर,चामुंडा माता मिशन संस्थापक अध्यक्ष नरेंद्रभाऊ रामदास बडगुजर व बडगुजर समाज चामुंडा माता मिशन सदस्य अनंत रूपचंद बडगुजर,हिरामण भिवसन बडगुजर या पाच जणांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी,श्रीमती रक्षाताई खडसे,रामदास आठवले, मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर,गजराजसिंह ओएसडी राष्ट्रपती भवन,खासदार साक्षी महाराज (उन्नाव),खासदार अमर काळे वर्धा,खासदार गणेशसिंग अध्यक्ष ओबीसी कल्याण समिती,खासदार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर,चंद्रपूर खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर,खासदार श्रीमती स्मिता वाघ जळगांव,सुप्रियाताई सुळे,माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक,नितीन नवीन कार्याध्यक्ष भाजपा नवी दिल्ली,निलेश काळभोर संचालक सूचना भवन यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

बडगुजर समाजास केंद्रीय ओबीसी आरक्षण सवलती नसल्यामुळे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून लोहारी येथील बडगुजर समाजाचे शिष्टमंडळातील पदाधिकारींनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे या विलंबामुळे समाजातील मुला मुलींना उच्च शिक्षण व केंद्रीय नोकरी पासून वंचित राहावे लागत आहे.या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून अंतिम अहवाल तातडीने केंद्रीय कॅबिनेटमध्ये सादर करण्यात यावा अशी या शिष्टमंडळाकडुन मागणी करण्यात आली आहे.दरम्यान बडगुजर समाजाच्या शिष्ठ मंडळाने विविध केन्द्रीय मंत्री,तथा संसद सदस्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर करण्यात आलेत.विशेष करून प्रामुख्याने अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी डाॅ.एन.डी. राऊत ओबीसी कृती समिती अध्यक्ष श्रावण फरकांडे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली असल्याचे समजते.त्यामुळे बडगुजर समाजास केंद्रीय ओबीसी सवलत मिळण्याचे काम प्रगती पथावर असल्याचे दिसून येत आहे.याआदी ही सदर समाजाच्या शिष्टमंडळाने दोन तीन वेळेस सातत्याने दिल्ली दौरा केला असुन समाजाची या मागणीचा प्रस्ताव भारत सरकारच्या कॅबीनेट पुढे मंजुरी साठी ठेवण्यात यावा तसेच मा.राष्टपती महोदय यांचे गॅझेटीयर मध्ये प्रसिद्ध होणे साठी शिष्टमंडळातर्फे प्रत्यक्ष भेटून मागणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.