Just another WordPress site

यावल नगरपालिकेच्या भाजपा नगरसेवक गटनेता निवडीचा चेंडू आमदार अमोल जावळे यांच्या कोर्टात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ डिसेंबर २५ सोमवार

येथील नगर पालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीत इतिहासात प्रथम भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवले असून पक्षाचे एकुण ८ जागांवर नगरसेवक विजयी झाले आहे.दरम्यान गटनेता निवडीचा निर्णय हा दोन ते तिन दिवसात होणार असुन गटनेता निवडीची सुत्रे रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

यावल नगरपालीकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रथमच लक्ष वेधणारी कामगिरी केली असुन राकेश मुरलीधर कोलते,रूबाब महमंद तडवी,सौ.कल्पना दिलीप वाणी,हेमराज जगन्नाथ फेगडे,योगेश विजय चौधरी,सविता विजय नन्नवरे,शुभांगी रोशन येवले,नंदा राजेन्द्र महाजन असे तब्बल ८ नगरसेवकांनी यंदा नगरपालीकेत प्रवेश केला आहे.यात अनुभवी म्हणुन राकेश कोलते आणी कल्पना वाणी यांनी दुसऱ्यांदा नगर पालीकेत एंट्री केली आहे.भारतीय जनता पक्ष हा नगर पालीकेत सर्वात मोठा गट असुन पुढील भाविष्यातील वाटचालीवर लक्ष केन्द्रीत करून गटनेत्याच्या निवडीचा चेंडू हा आमदारांच्या कोर्टात सोपविण्यात आला असुन सद्य स्थितीला गटनेत्याच्या पदासाठी दोन नावे पुढे आली असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.