Just another WordPress site

यावल येथे मराठी पत्रकार दिना निमित्ताने पत्रकारांचा सन्मान व रक्तदान शिबिराचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ जानेवारी २६ मंगळवार

येथील तालुका शेतकी खरेदी विक्री संघात आज ०६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने रक्तदान श्रेष्ठदान श्रेष्ठदान असते आपण केलेल्या रक्तदानाने अनेकांचे प्राण आपण वाचवु शकता हा विधायक आणि सामाजीक दृष्टीकोण ठेवुन पत्रकारांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मराठी पत्रकार दिनाचे औधित्य साधुन आयोजीत या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमात सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला.

येथील तालुका खरेदी विक्री शेतकी सहकारी संघाच्या सभागृहात आज मंगळवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात यावल नगर पालीकेच्या नुतन नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे,शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील,नगरसेवक हेमराज फेगडे,नगरसेवक योगेश चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शेखर पटेल,सुधीर चौधरी,सुनील गावडे,तेजस यावलकर, प्रमोद वाणी,भरत कोळी,विक्की वानखेडे,गोकुळ तायडे,मिलिंद जंजाळे,फिरोज तडवी,दिपक नेवे,राजु पिंजारी यांच्यासह आदी पत्रकारांचा यावेळी पुष्पगुच्छ व पेन देऊन शेतकी संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले.गोदावरी फाउंडेशनच्या रक्तपेढीच्या डॉ.श्रद्धा उबाळे,डॉ.कृणाल ढोबळे,डॉ.लक्ष्मण पाटील यांच्यासह त्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शेखर पटेल यांनी केले तर आभार तेजस यावलकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.