यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ फेब्रुवारी २६ शनिवार
भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी अक्षय धावारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून खासदार तथा भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद (रावण) यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान नियुक्तीपत्र देतांना छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी व भरीव कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वंचित,उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अन्याय व अत्याचाराविरोधात ठामपणे लढा देण्याची जबाबदारी अक्षय धावारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.तरुणांमध्ये विश्वास निर्माण करून भीम आर्मी भारत एकता मिशन अधिक मजबूत करण्यासाठी अक्षय धावारे प्रभावी भूमिका बजावतील असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.अक्षय धावारे यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.