Just another WordPress site

यावल शहरातील मेन रोड वरील गटारीची नगराध्यक्षांनी घेतली दखल !! नवीन लोखंडी जाळी बसविण्यात समस्या सोडविली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१० फेब्रुवारी २६ शुक्रवार

शहरातील मेन रोडवर असलेल्या हनुमान मंदिर समोरील गटारींची जाळी खराब झाल्याने नागरीकांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत होता.याबाबत नगरसेवक पराग सराफ ह्यांनी तात्काळ नगराध्यक्षा छायाताई आणी नगरसेवक अतुल पाटील यांच्याशी संपर्क वरील परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर विषयाची दखल घेत या ठीकाणी त्वरीत लोखंडी जाळी बसविण्यात आल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावल शहरातील नगरपालीकेकडे जाणाऱ्या मेन रोड वरील हनुमान मंदीरा समोरील मार्गावर असलेल्या गटारी वरील जाळी ही निकामी झाल्याने वर्दळीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांना व वाहनधारकांना त्रास सहन करावे लागत होते.दरम्यान या प्रभागाचे नगरसेवक व शिक्षण समितीचे सभापती पराग सराफ यांनी तात्काळ नगराध्यक्ष छाया पाटील व नगरसेवक अतुल पाटील ह्यांच्याशी संपर्क साधुन या गटारीवर त्वरीत नवीन जाळी बसविण्यासंदर्भात उपाययोजना करावी अशी माहिती देवुन मागणी केली असता नगराध्यक्ष छाया पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तात्काळ मंदिरासमोर जाळीचे काम करण्याच्या सूचना दिल्या व या ठीकाणी प्रशासनाच्यावतीने मंदिरा समोरील वाहतुकीला धोकादायक असणाऱ्या गटारीवर संरक्षण जाळी बसवण्यात आली.नगरपालिका प्रशासनाने तत्परता दाखवून गटारीवर नवीन जाळी बसविण्यात आल्याने नगराध्यक्ष छाया पाटील व नगरसेवक पराग सराफ यांचे परिसरातील नागरीकांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.