Just another WordPress site

“गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता चळवळला राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादाचे सरपंच नवाज तडवी यांच्याकडून कौतुक !!

गांधी तीर्थ राज्यस्तरीय प्रतियोगिता स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा डोंगर कठोरा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार !!

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव अंतर्गत गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५- २६ चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेजने सहभाग घेतलेला आहे.सदर राज्यस्तरीय प्रतियोगिता स्पर्धेत विद्यालयातील पुनम बाळू आढाळे (इ.११ वी),आम्रपाली बाळू आढाळे(इ.६ वी) या दोन्ही बहिणी गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५-२६ सहभागी शाळा अंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ या स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक तर रसिका प्रवीण पाटील (इ.५ वी) या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवून मेडल व प्रमाणपत्र मिळविले आहे.सदरहू या  गुणवंत विद्यार्थिनींचा आज दि.११ फेब्रुवारी बुधवार रोजी शाळेत आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नवाज तडवी यांच्या हस्ते श्रीफळ,रुमाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान आज आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी सरपंच नवाज तडवी यांनी आपल्या भाषणात नमूद केले की,गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितामुळे राज्यभरात स्वच्छतेसंबंधी चळवळ उभी राहिली असून त्यामुळे गावागावांतील शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत स्वच्छतेचा संदेश व महत्त्व रुजवले जात आहे व याचा सकारात्मक प्रतिसाद गावामध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमातून दिसून येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
प्रसंगी सरपंच नवाज तडवी यांनी शाळेने व विद्यार्थ्यांनी वर्षभर राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान,स्वच्छता जनजागृती रॅली,ई कचरा संकलन व जनजागृती अभियान,स्वच्छते संदर्भात निबंध,घोषवाक्य,वकृत्व,रांगोळी स्पर्धांचे आयोजन,एक पेड मा के नाम,वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य मार्गदर्शन,दिवाळी सुट्टीतील स्वच्छता उपक्रम,टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे,पथनाट्य व स्वच्छता गीत सादरीकरण,प्लास्टिक मुक्त शाळा,कागदी पिशव्या तयार करून व्यवसायिकांना वाटणे,२६ जानेवारी रोजी स्वच्छता संदेश देणे,आनंद मेळावा,गांधी विचार संस्कार परीक्षा आयोजन त्यासंबंधी व्हिडिओज,वृत्तपत्रामधील बातम्या,अहवाल तसेच वर्गांचे सूक्ष्म नियोजन,त्यामधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग,स्वच्छता समितीचे नियोजन व शाळा,शिक्षक शिक्षकेतर तसेच विद्यार्थी,ग्रामस्थ हे घेत असलेले मेहनत याची संपूर्ण माहिती घेतली व शाळा व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले.याप्रसंगी सरपंच नवाज तडवी,ग्रामपंचायत अधिकारी एम.टी.बगडे,मुख्याध्यापक नितीन झांबरे,प्रवीण कुयटे,राजू चिमणकारे,मनीषा तडवी,सचिन भंगाळे,शुभांगीनी पाटील,विवेक कुलट,चेतन चौधरी,शुभेच्छा अहिरे,ठकसेन राणे,पराग पाटील,मिलिंद भिरुड आदि उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.