Just another WordPress site

“यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा” !! कोरपावली विकास सोसायटी चेअरमन राकेश फेगडे यांचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ एप्रिल २६ शनिवार

तालुक्यातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीच्या किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत रब्बी हंगाम भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली असून तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांनी या संधी लाभ घेत शासनाच्या आधारभुत भाव योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आपली नोंदणी करावी असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी ३६९९ रुपये,मका २४०० रूपये याप्रमाणे निर्धारित करण्यात आले असून नोंदणीची अंतीम मुदत ३० एप्रील २६ पर्यंत राहणार आहे. सदर योजनेची नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत.यात रब्बी हंगाम २०२५-२६ (पीकपेरा असेलेला ७/१२ उतारा,खाते उतारा,(८अ),आधार कार्ड झेरॉक्स,बँक पासबुक झेरॉक्स,आधार लिंक मोबाईल नंबर ही कागदपत्रे लागणार आहेत.दरम्यान सदरील नोंदणी हि ऑनलाईन पद्धतीने बायोमेट्रीक मशीनद्वारे करण्यासाठी शेतकरी स्वत: नोंदणी ठीकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे.सदर नोंदणीचे ठिकाण हे कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटी.लि.कोरपावली ता.यावल या ठिकाणी राहणार असून या ठिकाणी परिसरातील शेतकरी बांधवांनी वरील कागदपत्रे मुदतीत सादर करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.