यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २६ बुधवार
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने यावल नगरपालीकेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यावल नगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी नगरपालिकेत यावल शहराच्या प्रथम नागरीक लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी महामानव डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहीली.प्रसंगी नगरपालिका शिवसेना ( उबाठा ) नगरसेवक गटनेते सागर चौधरी,नगरपालिका शिक्षण, सांस्कृतीक व क्रीडा समिती सभापती पराग सराफ,नगरसेवक उमर कच्छी,कॉंग्रेस कमेटी शहराध्यक्ष हकीम शेख मोहम्मद याकूब,माजी नगर सेवक करीम मनियार,शिवसेनेचे मयूर खर्चे,सामाजीक कार्यकर्ते निलेश बारी,किशोर उर्फ गोलु माळी,राहुल कचरे,विजय मराठे,विजय न्ननवरे,पल्लवी महाजन,संतोष नन्नवरे,मुकेश गजरे,पाणीपुरवठा विभागाचे डी एच धोत्रे,नगर पालिका कर्मचारी मोबीन शेख यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.