यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २६ बुधवार
शहरात “जयभिम”च्या जयघोषाने महामानव राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने सर्वपक्षीय आदरांजली व भव्य उत्साहाच्या व जल्लोषाच्या वातावरणात मिरवणुक काढून साजरी करण्यात आली.
शहरातील मुख्य बुरुज चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या नियोजित पुतळा स्थळावर डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेस रावेर-यावल आमदार अमोल जावळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील,माजी नगराध्यक्ष व नगरसेवक्र अतुल पाटील,नगरसेवक उमेश फेगडे,माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले,भाजपा ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक हेमराज उर्फ बाळासाहेब फेगडे,नगरसेवक रुबाब तडवी,नगरसेवक योगेश चौधरी,माजी नगरसेवक तथा सामाजिक संस्था,आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे,भाजपा यावल विभाग मंडळ अध्यक्ष सागर कोळी,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व संचालक नारायण चौधरी,शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे,सविता भालेराव,यावल काँग्रेस कमेटी शहराध्यक्ष हकीम शेख मोहम्मद याकुब,नगरसेवक उमर कच्छी,नगर सेविका शालु भालेराव,भुषण फेगडे,मजहर शेख,विर येवले यांच्यासह शेकडो भिमसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आठवडे बाजार पंचशील नगर व बुरूज चौकातुन शहरातील प्रमुख मार्गाने भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली.या मिरवणुकीत विष्णु पारधे,सागर गजरे,अनिल जंजाळे,युवराज सोनवणे,अरूण गजरे,राहूल गजरे माजी नगरसेवक मनोहर सोनवणे यांच्यासह असंख्य भिमसैनिकांनी यात सहभाग घेतला.