Just another WordPress site

किनगाव येथे महात्मा फुले जयंती निमित्त विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गुणगौरव !!

यावल-पोलीस नायक (प्रातिनिधी) :-

दि.१५ एप्रिल २६ बुधवार

तालुक्यातील किनगाव येथील श्री क्षत्रिय माळी समाज भवन येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ व्या जयंती निमित विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणीजणांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतश्रेष्ठ सावता महाराज,विठ्ठल रुक्माई व आई सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष जनार्दन महाजन होते तर प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून शिक्षक राकेश महाजन,सुरेश महाजन,माजी सरपंच आनंदा महाजन कलावंत मयूर महाजन ज्येष्ठ समाजसेवक गंगाराम महाजन,भानुदास महाजन इ.उपस्थित होते.यावेळी मनवेल आश्रम शाळेचे शिक्षक राकेश महाजन यांना नुकताच आदिवासी विकास विभाग,पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट कार्ये केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते त्यांच्यासह शिक्षक सुरेश महाजन (विखरण ) दूरचित्रवाणी (टि व्ही ) विविध मालिकांन मध्ये भुमीका साकारणारे उदयन्मुख कलावंत मयूर विठ्ठल महाजन किनगाव यांनी विविध मालिकांमध्ये कलाकार म्हणून भूमिका सादर केल्या तसेच इ.१०वी,इ.१२ वी व पदवीप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समाज मंडळाच्या वतीने सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जनार्दन महाजन यांनी सांगीतले की शैक्षणिक,सामाजिक व धार्मिक इ.सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माळी समाज मंडळ नेहमी सम्मान करते व यापुढेही असे कार्य अविरत सुरू राहील असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे सचिव महेंद्र नारायण माळी यांनी सूत्रसंचालन श्री संत सावता माळी बहुउद्देशीय संस्थेचे सहसचिव महेंद्र छगन माळी यांनी तर आभार संस्थेचे खजिनदार नत्थू महाजन यांनी मानले या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी श्री क्षत्रिय माळी समाजसेवा मंडळ व श्री संत सावता माळी बहुउद्देशीय संस्था किनगाव यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.