Just another WordPress site

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतीनिधी) :-

दि.१५ एप्रिल २६ बुधवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या परसाडे बु,येथे नुकताच आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या थाटा माटात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. मीना राजू तडवी यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षांपासून परसाडे येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात वधू- वर याच्याकडून ११०० रू नोंदणी फी घेऊन त्यांना लग्नासाठी साडी, ड्रेस त्याच बरोबर प्रत्येक जोडप्यांना पलंग, गादी, संसारोपयोगी ४५ भांड्यांचा सेट देऊन विवाह लावून दिले जातात. या वर्षी १० जोडप्यांचे विवाह सोहळा उत्साहात व थाटामाटात पार पडला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) च्या राष्ट्रीय प्रवक्ता श्रीमती प्रतिभाताई शिंदे,हर्षल पाटील (सभापती, कृउबा संचालक.यावल), सौ.सविता अतुल भालेराव.(माजी जि.प.सदस्या),अहमद जबरा तडवी (मा.सभापती, जि.प. जळगाव) राकेश वसंत फेगडे (माजी सभापतीव कृउबा स संचालक यावल),विलास चौधरी (तालुका सरचिटणीस, यावल),सागर कोळी (भाजपा मंडलअध्यक्ष,यावल), व्यंकटेशबारी(सोशल मिडिया प्रमुख, भाजपा),हुसेन जहांगीर तडवी (जिल्हा उपाध्यक्ष,शिवसेना) डाॅ. रमजान गुलाब तडवी (जळगाव ), राजू बिऱ्हाम तडवी.(अध्यक्ष, आसाम, सावदा),अजित हुसेन तडवी (अध्यक्ष, कृती समिती),दिलदार बलदार तडवी (डी.वाय.एस.पी. बुलढाणा) डॉ.फिरोज मुबारक तडवी (मुंबई),दिलीप अहमद तडवी (ग्रामविकास अधिकारी,नायगाव), सकावत याकूब तडवी (महसूल विभाग, तहसील, यावल),युनूस शहादूर तडवी (पेसा समन्वयक, रावेर) ,वसिम खान हाजी आसिफ खान (साकळी),साहेब खां मिरखा तडवी(पी.एस.आय.मुंबई) मुकद्दर सिकंदर तडवी.(मुंबई पोलीस), मुबारक उखर्डू तडवी, श (सरपंच, कुसुंबा),मुस्तफा हुसेन तडवी(सरपंच, मोहमांडली), रज्जाक अमिर तडवी (सरपंच), (राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) गटाचे कदीर खान.यावल,रशिद रसूल तडवी. (सौ खेडा)बाबू किताब तडवी (कक्ष अधिकारी, रावेर),मयबू हुसेन तडवी (मा.सरपंच,पाल.अय्युब तडवी(पाल), सौ.आशा राजू तडवी (जळगाव),मन्सूर समाज तडवी (उपसंपादक दै. हॅलो बातमीदार) फिरोज तडवी (संपादक, आदिवासी एक्सप्रेस ) इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच , उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि परसाडे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी तडवी-भील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमीद भायखा तडवी (ज्येष्ठ समाजसेवक) हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सौ. मीनाताई तडवी यांनी व आभार अलाउद्दीन तडवी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.