Just another WordPress site

सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबिर संपन्न !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ मे २६ गुरुवार

तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातील जामन्या, गाडऱ्या आणि ऊसमळी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन धरती आबा उन्नत ग्रामयोजने अंतर्गत तसेच माझे गाव आरोग्य संपन्न गाव योजने अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १९ मे रोजी करण्यात आले होते.
शिबिरात विविध आजाराचे तपासणी, करण्यात आली गरोदर माता, तपासणी, लहान बालके यांची तपासणी तसेच (non comunicable dises ) ncd अंतर्गत बी. पी. शुगर चेक करून सदर पेशन्ट यांना गोळ्या देखील देण्यात आल्यात,तसेच palitive care रुग्ण भेट, शिबिरात आरोग्य विषयक योजना बाबत माहिती व आपले आरोग्य आपल्या हाती त्यासाठी आपण आरोग्य विषयक काय काळजी घेतली पाहिजे या बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. उसमळीला लसीकरण करण्यात आले. आरोग्य शिबिरात एकूण १३५ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात आरोग्य टीम कर्मचारी उपस्थित होते, तीनही शिबिरांमध्ये डॉक्टर निलेश अग्रवाल, डॉक्टर उज्वला भंगाळे, वैद्यकीय अधिकारी सावखेडा सिम, डॉक्टर प्रवीण ठाकरे मनसेवी वैद्यकीय अधिकारी जामण्या हिराबाई पाडव योगिता पाटील शमीबाई बारेला आशा वर्कर, हेमंत पवार आरोग्य सेवक सेविका पुनम गावंडे आशा पाटील पुष्पा पाटील, रेखा बारेला, आरोग्य सेवक हनीफ तडवी, हेमांगी फेगडे नसीम पिंजारी समीम तडवी यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग होता

Leave A Reply

Your email address will not be published.