यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ जून २६ सोमवार
तालुक्यातील फैजपूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देविदास विष्णू सूरदास हे आपल्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल दि.३१ मे रविवार रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांना एका कार्यक्रमात सेवापुर्ती पर निरोप देण्यात आला.
रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील रहीवाशी व सन १९९३ मध्ये पोलीस दलात समाविष्ठ झालेले देविदास विष्णु सुरदास यांनी भुसावळ बाजारपेठ,मुक्ताईनगर,जिल्हा पेठ, एमआयडीसी जळगाव व पोलीस मुख्यालय अशा ठिकाणी उत्कृष्ठ प्रशासकीय सेवा करून सध्या फैजपूर पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना काल दि.३१ मे २६ रविवार रोजी सेवानिवृत्त झाले.एका छोटेखानी कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले देविदास विष्णू सूरदास यांना एका कार्यक्रमात सेवापुर्ती पर निरोप देण्यात आला.यावेळी फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत फैजपुर येथे पोलीस स्टेशनच्या परिसरात संपन्न झालेल्या सेवानिवृती कार्यक्रमात त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचारी व मित्र परिवारासह त्यांचे कुटूंब उपस्थित होते.