यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ जून २६ गुरुवार
तालुक्यातील भालोद येथे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१८ जून रोजी त्यांच्या आवाहनानुसार बॅनर्स,होर्डिंग्स,पोस्टर्स किंवा विविध जाहिरातींवर अनाठाई खर्च न करता “किमान एक वृक्ष लागवड” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात येऊन त्यांचा वाढदिवस उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
दरम्यान आमदार अमोल जावळे यांचा आज दि.१८ जून २६ गुरुवार रोजी वाढदिवस असल्याने आपल्या वाढदिवसानिमित्ताने बॅनर्स,होर्डिंग्स,पोस्टर्स किंवा विविध जाहिरातींवर अनाठाई खर्च न करता किमान आपआपल्या परीने किमान एक झाड लावण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.तद्नुसार आमदार अमोल जावळे यांचा शब्द कार्यकर्त्यांनी पाळला असून सत्यात उतरविला आहे.आज दि.१८ जून २६ गुरुवार रोजी तालुक्यातील भालोद येथील डॉ आंबेडकर नगर स्मशानभूमीत भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने वटवृक्ष,पिंपळ,जांभूळ,रामफळ,शिसम,आंबा अशा विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सचिन भालेराव,गौरव भालेराव,सुमित भालेराव,आशुतोष भालेराव,योगेश भालेराव,करण भालेराव,प्रवीण भालेराव,रोहित भालेराव,युनुस तडवी,भीम आर्मी अध्यक्ष गौरव सोनवणे,सचिन वानखेडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.