Just another WordPress site

“भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे” !! राज ठाकरे यांची परखड भाष्य करणारी पोस्ट चर्चेत !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०४ जुलै २६ शनिवार

मुंबईतील मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत.कुठे झाड कोसळत आहे तर कुठे उघड्या मॅनहोलमुळे अपघाताची घटना घडत आहे व या दुर्घटनेत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.या घटनेनंतर मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच विधिमंडळाच्या आवारात भाजपा आमदारांनी या घटनेंवर बोलत असताना हास्यविनोद केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी असून विरोधकांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परखड प्रश्न विचारले असून राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक दीर्घ पोस्ट लिहून “भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे” अशी परखड टीका केली आहे.ते म्हणाले,“भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे व हे पूर्व,पश्चिम,उत्तर,दक्षिण भारतातील लोक सर्रास बोलत आहेत.केंद्रातील लोक वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तू पसरू देताय ?”

राज ठाकरे पुढे म्हणाले,देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता.महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचे आणि उमदेपणाचे एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होते पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे.तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही आहे अशी टीकाही करताना राज ठाकरे यांनी इंग्रजीतील एक प्रसिद्ध म्हण उद्धृत केली असून कोणाला कशाचाच खेद नाही,खंत नाही अशी
परिस्थिती आहे आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत असे सांगत राज ठाकरेंनी भाजपामधील वाचाळवीरांचा समाचार घेतला.भाजपामधील बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा अंकुश नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली असून ते म्हणाले,“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत,संवेदनशील आहेत असे महाराष्ट्राला वाटत होते आणि मलाही वाटत होते पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.