Just another WordPress site

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अंजाळे ग्रामपंचायततर्फे भावपूर्ण अभिवादन !!

यावलपोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ जुलै २६ गुरुवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त ग्रुप ग्रामपंचायत अंजाळे यांच्या वतीने काल दि.२२ जुलै बुधवार रोजी ग्रामपंचायतच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात,ग्रामीण विकासासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला व त्यांनी केलेल्या समाज व देशहिताच्या निर्णय हे युवकांना प्रेरणा देणारी राहील व स्व अजीतदादांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळातील त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ज्ञानदेव बोरोले,अंजाळे गावचे सरपंच यशवंत सपकाळे,ग्रामपंचायत सदस्यआनंद सपकाळे व अशोक सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व श्रद्धापूर्वक पार पडला.उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.