Just another WordPress site

बुलढाणा पोलीस मुख्यालय परिसरात विवीध प्रजातीच्या १५० वृक्षांची लागवड उत्साहात !!

शेख इम्रान,पोलीस नायक

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.०३ ऑगस्ट २६ सोमवार

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली “हिरवी पृथ्वी,निरोगी सृष्टी” या संकल्पनेतून काल ०२ ऑगस्ट २६ रविवार रोजी बुलढाणा पोलीस मुख्यालय परिसरामध्ये विविध प्रजातींच्या १५० वृक्षांचे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले.

दरम्यान पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना,”हिरवी पृथ्वी,निरोगी सृष्टी” या संकल्पनेच्या अनुषंगाने वृक्ष रोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगीतले.यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे शुभ हस्ते पोलीस मुख्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण लागवडीची सुरवात करण्यात आली.तसेच उपस्थित मान्यवरांचे हस्ते आवळा,आंबा,चिंच,बांबू,गुलमोहर,पाम व ईतर प्रजातीच्या एकूण १५० झाडांची लागवड करण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा,पो.नि.बाळकृष्ण पावरा प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) बुलढाणा यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विकास तिडके राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय बुलढाणा तसेच नवप्रविष्ठ पुरुष व महिला पोलीस शिपाई अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.