Just another WordPress site

यावल येथे कत्तलीच्या उद्देशाने तळघरात बांधुन ठेवलेली जनावरे व कच्चे गोमास जप्त तर चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ ऑगस्ट २६ शनिवार

येथील शहरातील डांगपुरा मन्यारवाडा या परिसरात एका घरातील तळघरात सुमारे एक लाख रूपये किमतीचे चार जिवंत गोवंश जनावरे व ३ म्हैस वर्गीय जनावरे आणी ६५ किलो गोवंश कच्चे मास पोलीसांनी सकाळच्या सुमारास डांगपुरा मन्यारवाडा या ठीकाणी संशयीत आरोपीनी आणून कत्तलीसाठीच्या उद्देशाने बेकायद्याशीर ठेवल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल मधील डांगपुरा येथे बेकायदेशीर गोवंश कत्तल व गोमांस विक्री प्रकरणात ४ संशयीत आरोपीं सैय्यय रशीद निसार कुरेशी,सैय्यद आरिफ सैय्यद निसार, सैय्यद हाफीज सैय्यद निसार कुरेशी आणि सैय्यद अन्सार सैय्यद निसार कुरेशी यांच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (२o१५) च्या सुधारणा कलमान्वये पोलीस हवलदार पुरुषोत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सुमारे ९८ हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.