Just another WordPress site

यावल शहरातील विस्तारित वसाहतीमध्ये रहदारीच्या मार्गावरील धोकादायक लोंबकणाऱ्या विद्युत तारांचे नियोजन करण्याची शहरवासीयांची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ ऑगस्ट २६ गुरुवार

येथील शहरातील विस्तारीत वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी विद्युत वाहीनीची तारे लोंबकत असल्याने सार्वजनिक कार्यक्रमास अडचणी होतांना दिसत आहे.तसेच या परिसरातुन जाणाऱ्या अवजड वाहनांसह पादचाऱ्यांना देखील धोका निर्माण झाला असून विजवितरण कंपनीने तात्काळ या विद्युत वाहीनीच्या तारांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी गंगानगर व ईतर क्षेत्रातील नागरीक करीत आहे.

यावल शहरातील विस्तारित वसाहतीच्या परिसरातील लोकवस्तीत महावितरण कंपनीच्या वतीने कोणतेही दुरदृष्टिकोण न ठेवता मिळेल त्या ठीकाणी विद्युत वाहिनीचे पॉल बसविले असुन सदरचे खांब यांचे नियोजन चुकल्याने या खांबांवर विद्युत पुरवठा करणारी तारे हे देखील मिळेल जमेल त्या पद्धतीने टाकण्यात आले आहे.सदरची विद्युत वाहिनी करणारे तार हे नागरी वाहतुकीच्या मार्गाला फार मोठी डोकेदुखी ठरत असुन जुन्या पद्धतीने टाकण्यात आलेली विद्युत वाहिनीची ही तारे रस्त्याच्या काही अंतराच्या उंचीवर असल्याने नागरीकांसाठी व चारचाकी अवजड वाहनधारकांसाठी तसेच वादळी वाऱ्यासाठी धोक्याची झाली आहे.सदरहू विद्युत कंपनीने तात्काळ या विषयाला गांर्भीयांने घेवुन रहदारी मार्गामध्ये आलेल्या विद्युत तारांचे वेळीच नियोजन करावे अशी मागणी शहरवासीयांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.