मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असे सूचक वक्तव्य केले आहे तसेच कायद्याने ३० टक्के आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही मुली राजकारणात सहभागी होऊन ते मिळवू असेही मत त्यांनी व्यक्त केले त्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो यात्रेत’ सहभागी झाल्या आहेत.यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना हे वक्तव्य केले आहे.शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की,अनेक वर्षांपासून नेत्यांची मुलेच राजकारणात येत आहेत मात्र आता आमच्या पीढित नेत्यांच्या मुलीही राजकारणात येत आहेत.आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असे आम्हाला वाटते आहे कारण कुठे ना कुठे आमच्यातील आत्मविश्वास वाढतो आहे.काँग्रेस पक्ष महिला आरक्षणासाठी आधीपासून लढत आहे.लोकसभा आणि विधानसभेत किमान ३० टक्के आरक्षणाची आमची मागणी आहे ते आरक्षण कायद्याने मिळणार नसेल तर मग आम्ही मुली राजकारणात येऊन या मार्गाने घेण्याचे आम्हा मुलींचे नियोजन सुरू आहे त्यात यश आले तर ते सर्व महिलांसाठी चांगले ठरेल असे मत शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या,महिलांचा प्रतिसाद खूप वाढला आहे हे बघून खूप आनंद होत आहे.माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली आहेत त्यांनी जबाबदाऱ्याही घेतल्या आहेत.भारत जोडो यात्रेत आम्ही रात्री एकत्र बसलो की आमच्या चर्चा होतात. भारत जोडो यात्रेत जसे सहजपणाचे वातावरण आहे तसे असले की घरचेही पाठवायला मागेपुढे पाहत नाही.हे वातावरण काँग्रेस पक्ष देतो आहे आणि याचा मला अभिमान आहे.राजकारण म्हटले की फक्त पुरुष आणि मुले असे चित्र दिसायचे त्यामुळे आधी मनात विचार यायचा की कार्यक्रमांना कसे जायचे कोणाशी किती बोलायचे अशा अडचणी यायच्या आता सहजपणा आला आहे जितकी मुले आहेत तितक्याच मुली आहेत त्यामुळे समानतेची अनुभूती होत आहे असेही शिवानी वडेट्टीवार यांनी नमूद केले आहे.