हैदराबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महिला आणि मुलींची तस्करी करणाऱ्या तसेच त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा हैदराबात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मागील काही वर्षांत तब्बल १४०० मुली व महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आले आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात सायबराबाद आणि हैदराबादच्या हद्दीत ३९ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.