Just another WordPress site

दहिगाव येथील तलफीन बानो या चिमुकलीचे पवित्र रमजानचे रोजे पूर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील दहिगाव येथील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन यांची आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महीन्याचे संपुर्ण रोजे पूर्ण केले असल्याने या चिमुकलीच्या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सध्या सर्वत्र मुस्लीम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असुन या महीन्यात ईस्लाम धर्मात पवित्र रमजानला अनन्यसाधारण महत्व आहे.या महीन्यात मुस्लीम बांधवांकडुन अल्लाहची विशेष इबारत (उपासना) केली जाते यासाठी रोजेदार हे संपुर्ण दिवसभर निरंकार रोजे (उपवास) पाळत असतात.अशाच प्रकारे तालुक्यातील दहिगाव येथील राहणाऱ्या आठ वर्षाच्या तलफीन बी हिने पवित्र रमजान महीन्याचे पुर्ण रोजे (उपवास) करून समाजामध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे.मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महीन्याचा शेवट होणार असून दहिगाव येथील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन यांच्या आठ वर्षाची मुलगी शेख तलफीन बानो हिने पवित्र रमजान महीन्याचे संपुर्ण रोजे पूर्ण केले आहेत.शेख तलफिन बानो हिने केलेल्या या धाडसाचे समाज बांधवांमध्ये विशेष कौतुक करण्यात येत असुन तलफीन बानोची आई,वडील शेख एहेतेशाम शेख कदीरोद्दीन (मिस्त्रि) व सर्व कुटुंब्यांनी तिला आशिर्वाद दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.