बच्चू कडू म्हणाले की,आम्ही आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलोय.काल आमची एक बैठक पार पडली त्यानंतर आता आम्ही विधानसभेच्या १५ ते २० जागा लढवणार आहोत तसेच शक्य झाल्यास लोकसभेची एक जागा लढवण्याची आमची तयारी आहे.आम्ही सगळे पक्ष जे सत्तेत आहोत त्यात भाजपा असेल शिंदे गट असेल या सर्वांशी चर्चा करू तसेच घटकपक्ष म्हणून या सगळ्याला कशा पद्धतीने सामोरे जाता येईल त्याची तयारी सुरू आहे.आगामी निवडणुका तुम्ही भाजपा आणि शिंदे गटाबरोबर लढणार आहात का असा प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले सध्या तरी तशी परिस्थिती आहे.आमची एकत्र लढण्याची तयारी आहे.आमची युती नाही झाली तरी आमची तयारी आहे.बच्चू कडू म्हणाले,लोकसभेला आम्ही अमरावती जागेसाठी अग्रही आहोत.विधानसभेला अमरावतीतल्या अचलपूरसह आणखी एक जागा.अकोल्यातल्या दोन,वाशिममधील एक,नागपुरातली एक,नाशिक,सोलापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात १५ ते २० जागा लढण्याची आमची तयारी आहे.आमची अमरावती लोकसभा लढवण्याची ताकद आहे.मी स्वतः याआधी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढलो आहे.कोणाच्याही पाठिंब्याशिवाय मी तेव्हा लढलेलो तेव्हा केवळ ५ हजार मतांनी मी पराभूत झालो होतो असे बच्चू कडू यांनी नमूद केले आहे.