संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत याबाबत संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली असून शिंदे फडणवीस सरकारच्या काळात औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले कसे जातात? असा सवाल विचारतच हे तुमच्या सरकारचे अपयश आहे असे संजय राऊत यांनी आज संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.महाराष्ट्राच्या काही भागात कोल्हापूरात दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.संभाजीनगरलाही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. आज कोल्हापूरच्या रस्त्यावर हिंदूत्त्वावादी संघटना उतरल्या आहेत.काही तरुणांनी वादग्रस्त स्टेटस ठेवला,औरंगजेबाचा फोटो ठेवला त्यातून ही दंगल उसळली असे चित्र निर्माण झाले असून मी संभाजीनगरला बसून बोलतोय.याच मातीत आपण औरंगजेबाला गाडले हीच ती भूमी जिथे औरंगजेबाला गाडले.औरंगजेबाचे कोणी भक्त असतील आणि औरंगजेबाचे फोटो नाचवत असतील तर त्यांना महाराष्ट्रात काय देशात राहण्याचा अधिकार नाही त्यांनी पाकिस्तानाच निघून जावे ही शिवसेनेची आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आम्ही आजही ठेवली आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.
फक्त निवडणुका व राजकारणासाठी हिंदूत्त्व निर्माण करायचे,तणाव निर्माण करायचा आणि महाराष्ट्राची शांतता भंग करायची हा विरोधकांचा डाव आहे.ज्या लोकांनी हा स्टेटस ठेवला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल केले पाहिजे ती हिंमत तुम्ही दाखवायला पाहिजे.जर तुम्ही स्वतःला शुद्ध हिंदुत्त्ववादी म्हणता मग त्यांचे सरकार असताना अशाप्रकारची औरंगजेबाची फोटो नाचवण्याची,फोटो स्टेटसला ठेवण्याची हिंमत कशी करू शकतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.तुमचे सरकार हिंदुत्त्ववादी आहे.हे चालणार नाही ते चालणार नाही,अमुक सहन करणार नाही तमुक सहन करणार नाही मग या शिंदे फडणवीस सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले कसे जातात? हे तुमच्या सरकारचे अपयश नाही का? की हे सगळ तुम्हीच घडवून आणताय का? त्याचे उत्तर मिळाले पाहिजे.हिंदुत्त्ववाद आम्हाला माहितेय असेही संजय राऊत म्हणाले.औरंगजेबाचा द्वेष आणि राग करतोय त्याच्याविरोधात मोर्चे काढतो तर याच संघटनांनी पुण्यात डॉ. कुरुळकर ज्याने पाकिस्तानला आपली गुपित विकली त्याच्याविरोधातही मोर्चे काढायला पाहिजे.हा औरंगजेबाइतकाच विषय गंभीर होता. संघाचे काही लोक पाकिस्तानशी हातमिळवणी करतात.देशातील गुपित विकली जातात आणि ट्रॅपमध्ये सापडली जातात अशी टीकाही त्यांनी केली.या राज्यात तणाव राहू नये,शांतता राहावी या राज्यात सर्व जाती धर्मात सर्वांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे.पण या राज्यात सरकारच्या पायाखालची वाळू सरकतेय.ताबडतोब या गुन्हेगारांवर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली आहे.