Just another WordPress site

“वारकरी बांधवांवर पोलीस लाठीमार! हि घटना दु:खदायक तशीच मनाला चीड आणणारी”!!

वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा व लाठीमार करणाऱ्या सरकारचा अजित पवार यांच्याकडून निषेध

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे.महाराष्ट्राच्या संत,भक्तीपरंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असे यापूर्वी घडले नव्हते.सोहळ्याचे योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता असे सांगत वारकरी बांधवांवर करण्यात आलेल्या लाठीमारीचा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी साताऱ्यात संताप व्यक्त केला असून लाठीचार्ज घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे.महाराष्ट्राच्या संत,भक्तीपरंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असे यापूर्वी घडले नव्हते.आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे.सोहळ्याचे योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता परंतु तसे घडले नाही.वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे.आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म,भक्ती परंपरेचे वैभव आहे.दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात.वारी आणि प्रस्थान सोहळ्याचे योग्य नियोजनही केले जाते व वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात.परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचे दिसत आहे ही संपूर्ण घटना दु:खदायक तशीच मनाला चीड आणणारी आहे अशी घटना यापुढे घडू नये यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी.कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होताना सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा.ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावे असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.