मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केली असून राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर करून शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.या जाहिरातीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या असून यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली असून अजित पवार यांनी म्हटले आहे की,शिंदे साहेब किंवा हे जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले मला काय कळले नाही.मुळातच हा पक्ष त्यांनी स्वतःकडे का घेतला?कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत,आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत असे म्हणत त्यांनी पक्ष स्वतःकडे खेचून घेतला परंतु त्या जाहिरातीवर कुठे आनंद दिघेंचा फोटो दिसेना कुठे बाळासाहेबांचा फोटो दिसेना अशी मिश्किल टीका त्यांनी केली आहे.