Just another WordPress site

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आयोजीत आयुष्यमानभव कार्येक्रमाअंतर्गत ३९६७ नागरीकांची आरोग्य तपासणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-

दि.९ ऑक्टोबर २३ सोमवार

तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.८ ऑक्टोबर रोजी आयुष्यमान भव अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी मेळाव्यास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सदरील आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे करण्यात आले होते.या आरोग्य मेळाव्यात किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रातील एकूण ३९६७ नागरीकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली.याआरोग्य मेळाव्याला चोपडा विधानसभेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी भेट दिली तर तालुका आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.या आरोग्य मेळाव्यात सर्व तपासण्या मोफत असल्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.यात १२७० सामान्य रुग्ण,१८ लहान बालके तपासणी,३१५ कुपोषित बालकांची तपासणी,३८ गरोदर मातांची तपासणी,१५२ गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी,५० स्तन कॅन्सरची तपासणी,३८नेत्र चिकित्सक तपासणी,६५५ सामान्य रुग्ण,८९० अस्थिरोग तपासणी,५२ फिजिओथेरपी तपासणी, १४४ मानसोपचार तपासणी,५३ त्वचारोग तपासणी,२१४ नाक,कान व घसा तपासणी,७८ दंत रोग तपासणी,४४ व २२ इतर रुग्ण तपासण्या करण्यात आल्या तसेच महालॅब यांच्याकडून सर्व रक्त तपासणी मोफत करण्यात आल्या व रक्तदान शिबिरही घेण्यात आले.या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला रक्तदानाचा संदेश दिला आणि म्हणून त्यांना ५० हजार रूपयांचा विमा तात्काळ देण्यात आला तर या आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत २७ आभा कार्ड काढण्यात आले व ५ नागरीकांनी अवयवदानाची नोंदणीही केली.अशाप्रकारे या आरोग्य तपासणी मेळाव्या मध्ये पारिसरातील एकूण ३९६७ नागरीकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.या आरोग्य तपासणी मेळाव्यासाठी अग्निशामक दल तसेच फिरते शौचालय नगरपरिषद यावल यांच्याकडून ग्रामस्थांच्या सोयीसाठी व्यवस्था केलेली होती तसेच यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी औषधी निर्माता,आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,गटप्रवर्तक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका तसेच किनगाव येथील स्वयंसेवक आणि गावातील फार्मासिस्ट संघटना यांनी औषधे आणि स्वतः उपस्थित राहून हा आरोग्य तपासणी मेळावा यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले.

प्रसंगी तालुका क्षयरोग व कुष्ठरोग डॉ.तायडे निरामय हॉस्पिटलचे डॉ.देशपांडे बालरोग तज्ञ डॉ.प्रशांत जावळे,डॉ.दीपक चौधरी,दंतरोग तज्ञ डॉ.स्नेहल जावळे,डॉ.वराडे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम टीम डॉ.दौलत निमसे,गोदावरी हॉस्पिटलचे सर्व विभागाचे डॉक्टर,चांडक हॉस्पिटलचे डॉ.निलेश चांडक,कांताई नेत्रालय,रेडक्रॉस सोसायटी यांच्यासह पियुष हॉस्पिटलचे डॉ.रोहन पाटील,रजनिगंधा हाँस्पिटलचे अस्थीरोग तज्ञ डॉ.अभिजित पाटील,कॅन्सर तज्ञ डॉ.प्रशांत चोपडा,डॉ.सागर पाटील,डॉ.प्रफुल काबरा,जनरल फिजिशियन डॉ.सुनिल सुर्यवंशी, बालरोग तज्ञ डॉ.हेमंत पाटील,रेडक्राँ.सोसायटीसह अस्थीरोग विभाग,त्वचा विभाग ,मानसोपचार विभाग,कुष्ठरोग व क्षयरोग विभाग,गरोदर माता तपासणी,गर्भाशय कॅन्सर,स्तन कॅन्सर,मुखरोग कॅन्सर,बालरोग तपासणी,कुपोषित बालके तपासणी सिकलसेल तपासणी,हिवताप व डेंगू तपासणी,मुख कर्करोग तपासणी,डोळे तपासणी व कान,नाक,घसा तपासणी या आरोग्य मेळाव्यात करण्यात आल्या.

सदरील आरोग्य तपासणी मेळावा यशस्वितेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन,डॉ.तरांनुम शेख,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अश्फाक शेख,डॉ.वकार शेख,डॉ.मोहसीन शेख,डॉ.धनंजय जोशी,डॉ.सोनल भंगाळे,आरोग्य सहायिका मंगला सोनवणे, आरोग्य सहायक सुरवाडे,लिपिक जावेद जमादार,आरोग्य सेविका कविता सपकाळे,मोहिनी धांडे,आफरीन तडवी,शीला जमरा,नवादी बारेला, सुजाता सोनवणे,आरोग्य सेवक दिपांकर बर्डे,जे.के.सोनवणे,मनोज बारेला,पवन काळे,शिपाई सरदार कानाशा,कु.पियुष बैरागी,वाहन चालक कुर्बान तडवी,सफाई कर्मचारी गोपी सपकाळे,स्वयंसेवक मिलिंद जंजाळे,आरोग्य केंद्रातील सर्व आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा,पाडळसा,भालोद,सावखेडासिम,साकळी येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. तर लाभार्थींसह सर्व नागरीकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजू तडवी व किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मनिषा महाजन यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.