यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील यावल शहरातील आई हॉस्पिटलचे संचालक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत तालुक्यातील आदिवासी विटवा पाडा येथील आदिवासीं परिवारांसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदरहू आदिवासी पाड्यावर घेण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमातून येणाऱ्या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार घडावे या उद्देशाने दिवाळी निमित्ताने गोर,गरीब,गरजु आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता यावे या उद्देशातून सदरील उपक्रम सुरु ठेवण्यात आला असल्याचे आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.
आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपला दिवाळी सण तालुक्यातील विटवा पाडा येथे सातपुडयातील आदिवासी दुर्गम परिसरातील आदिवासी परिवारांसोबत सहकुटुंब साजरा केला.सर्वदूर दिवाळी साजरी होत असतांना समाजातील अतिदुर्गम भागातील गोर गरीब आदिवासी बांधव मात्र आर्थिक परिस्थितिमुळे या आनंदापासून दूर असतात.सदरहू या आदिवासी घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा,त्यांचीही दिवाळी गोड व्हावी व त्यांनाही काही क्षण आनंद मिळावा या उद्देशाने व येणाऱ्या पिढीला देखील आपण समाजाप्रती देणे लागतो असे संस्कार घडावे या उद्देशातुन राबवत असल्याचे प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.आपल्याच सभोवताली अनेक असे गरीब होतकरू लोक असतात की त्यांना एकावेळेचे जेवणासाठी कसरत करावी लागते त्यामुळे सण साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात परिणामी त्यांनाही वाटते की आपणही गोड खावे,नवीन कपडे घालावे मात्र त्यांच्या नशिबी नेहमी अंधार असतो यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजूना आपण मदतीचा हात द्यावा म्हणुन दरवर्षी यावल-रावेर तालुक्यातील आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आदिवासी वस्तीवर जावुन सह कुटुंब दिवाळी साजरी करीत असतात.तद्नुसार यंदा देखील त्यांनी विटवा आदिवासी पाड्यावर जावुन फराळ,मिठाई आंघोळीसाठी उटन व साबण,पणती,लहान मुलांना फटाके वितरण करण्यात आले.प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी हाती घेतलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे भारावलेल्या आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.यावेळी डॉ.कुंदन फेगडे,शैलेंद्र फेगडे,डॉ.जागृती फेगडे,दिनेश बारेला,सागर लोहार,मनोज बारी,दिपक फेगडे यांच्यासह आदिवासी बांधव यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.